जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२३ । देश पुन्हा एकदा हादरला आहे. दिल्लीच्या गीता कॉलनीतील उड्डाणपुलाजवळ तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पण या घटनेमुळे पुन्हा एकदा दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. फॉरेन्सिक टीम देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू करण्यात आली. घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून आसपास तरुणीच्या शरीराचे आणखी काही तुकडे आणि हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र मिळतेय की नाही याचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज बुधवारी सकाळी 9.15 वाजताच्या सुमारास त्यांना गीता कॉलनी उड्डाणपुलाजवळ काही मानवी शरीराचे तुकडे पडल्याची माहिती मिळाली. तरुणीच्या शरीराचे आणखी काही तुकडे मिळतात का, याची पाहणी पोलीस करत आहेत. हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र किंवा काही पुरावे आढळतात का, याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.