---Advertisement---
जळगाव जिल्हा

गोदावरी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट निकालासह उत्तुंग भरारी

new project (1)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे निकाल नुकताच जाहीर झाला. उत्कृष्ट निकालाची परंपरा राखत विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेत महाविद्यालयाचे नाव गौरवित केले आहे.

new project (1)

यांत्रिकी विभागातून प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांमधून अजिंक्य सपकाळे (७२.८२%) प्रथम तर चैतन्य माळी (७२.४७%) हा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. तसेच द्वितीय वर्ष यांत्रिकी मधून यश बोरनारे (७२.८९%) प्रथम तर आकाश धांडे (६९.४४%) द्वितीय आणि मयूर राठोड (६८.२२%)तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत व तृतीय वर्ष यांत्रिकी मधून नयन महाजन (८६.५७%) प्रथम तर गणेश चव्हाण (८४.८६%) द्वितीय व गायत्री महाजन (७९.५२%) गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. संगणक विभागातून प्रथम वर्षातून नुपूर चौधरी ( ८५.८८%) प्रथम तर पुष्पल फेगडे (८२.१२% ) द्वितीय व चिन्मयी चौधरी (८१.७७ %)गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. द्वितीय वर्ष संगणक विभागातून युक्ता पाटील (८९.६५ %) प्रथम तर मोहिनी जाधव (८८.८२% ) द्वितीय तर सार्थकी पाटील (८७.८८%) गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. तृतीय वर्षातून महिमा भोईटे (९२.४४%) गुण घेऊन प्रथम तर भूषण इंगळे (९२.२२%) गुण घेऊन द्वितीय तर धनश्री बडगुजर (९१.४४ %) गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत.

---Advertisement---

विद्युत विभागातून प्रथम वर्षातून हेमांगी देशमुख ( ७६ %) गुण घेऊन प्रथम तर राकेश कोल्हे (७५.१८) द्वितीय, निखिल खैरे (७३.२९) तृतीय, द्वितीय वर्षातून वेदिका कासार (८१.१८ %) प्रथम तर शालिनी राय (७९.७७%) द्वितीय तर श्रीजिता सासमल (७८%)गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. तृतीय वर्षातून ग्रीष्मा पाटील (८९.७०%) गुण घेऊन प्रथम तर मिताली चौधरी (८५.२०%) गुण घेऊन द्वितीय तर पुष्पज भालेराव (८५.१० %) गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत.संगणक शास्त्र अभियांत्रिकी विभागातून प्रथम वर्षातून मानसी पाटील ( ८७.८८%) प्रथम तर मोहक पाटील (८६.५९% ) द्वितीय व प्रणव पाटील (८५.८८ %)गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. द्वितीय वर्ष संगणक शास्त्र विभागातून खुशबू खडके (८७.४१ %) प्रथम तर रानी गावंडे (८६.२४% ) द्वितीय तर हुझेफा पटेल (८४.४७%) गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत.कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यांत्रिक शिक्षण विभागातून (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग) प्रथम वर्षातून रोशनी राजपूत ( ८४.१२%) प्रथम तर सोहम नांदेडकर (८०.३५% ) द्वितीय व भाग्यश्री सावकारे (७९.८८ %)गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स व संगणक विभागातून प्रथम वर्षातून जिया नामदेव (८१.०६%) प्रथम तर उत्कर्ष चुडीवाले (८१.०५% ) द्वितीय व तन्मय रणदिवे (७७.७७ %) गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत.गोदावरी फाउंडेशनचे संस्थाध्यक्ष माजी डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव) डॉ.केतकी पाटील (सदस्य) व डॉ. अनिकेत पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील सर व तंत्रनिकेतनचे समन्वयक प्रा. दीपक. के. झांबरे सर तसेच यांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. कैलास माखिजा, विद्युत विभाग प्रमुख प्रा. चेतन विसपुते, संगणक शास्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. वैष्णवी नारखेडे,संगणक विभाग प्रमुख प्रा. अमिता महाजन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग विभाग प्रमुख प्रा. अदिती अहिरे, इलेक्ट्रॉनिक्स संगणक विभाग प्रमुख प्रा.चंद्रकांत शिंपी, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. पवन भंगाळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---