जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२२ । जळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन समाजसेवक ईश्वर सोनार, टोरंट न्यूट्रशियन चे संचालक दिनेश महाजन व व्यायाम प्रशासक हर्षल ब्रम्हे यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल येथे ‘१ली कार्तिकी श्री २०२२’ जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे १६ ऑक्टोबर, रविवार रोजी आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. पो. उपनिरीक्षक शरद बागल यांच्या हस्ते शक्ती दैवत श्री हनुमान श्रद्धा व सबुरीचे श्री साईबाबा यांच्या प्रतिमेस विधिवत पूजेसह पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून रंगमंचास श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.
एरंडोल सारख्या ग्रामीण भागात शरीर सौष्ठव स्पर्धेचे पहिल्यांदाच आयोजन केल्यामुळे या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे पहिला गट – प्रथम क्रमांक शाहिद मलिक ( एफ.एस. जीम पाचोरा ), द्वितीय क्रमांक उदयोग राज जाधव ( आय जीम एरंडोल ), तृतीय क्रमांक सुनील माधवराव पाटील ( मोरया फिटनेस चोपडा), चतुर्थ क्रमांक अकरुद्दीन अनिस ( जी.के. फिटनेस रावेर ), पाचवा क्रमांक जय सारंग पाटील ( एम.एच. फिटनेस भुसावळ ) दुसरा गट – प्रथम क्र.कुलजीतसिंग ( वेन्स जीम , भुसावळ ) , द्वितीय क्र . आश मोहम्मद ( बॉडी पॉवर , चोपडा ) , तृतीय क्र . शे . साबीर शे . हमीद ( जि.के. फिटनेस , रावेर ) , चतुर्थ क्र . शशिकांत गोटू पाटील ( रॉयल फिटनेस , जळगांव ) , पाचवा क्र . इमरान अली अजगर ( शेरा जिम , भुसावळ ) तिसरा गट – प्रथम क्र . करन विलास पाटील ( तिवारी फिटनेस , एरंडोल ) , द्वितीय क्र . शेख फैजुल ( द फिटनेस , वरणगांव ) तृतीय क्र . इरफास खान ( जि.के. फिटनेस . रावेर ) , चतुर्थ क्र . राहुल बापु भोई ( मसल फॅक्टरी , अमळनेर ) , पाचवा क्र . राहुल नरवाडे ( जिगर फिटनेस , भुसावळ ) चौथा गट प्रथम क्र . जितेंद्र गिरी ( जिगर फिटनेस , भुसावळ ) , द्वितीय क्र . जॅकी फारूक खाटीक ( एफ . एस . जिम , पाचोरा ) तृतीय क्र . इरशाद खान इमतीय ( द एम.पी. स्टुडीओ ) , चतुर्थ क्र . अनिस शेख ( श्री साई बजरंग जिम , जळगांव ) , पाचवा क्र . वैभव सोपान सोनवणे ( शनेश्वर व्यायाम शाळा , जामनेर ) १ ली ” कार्तिक श्री ” २०२२ किताब विजेता जितेंद्र गिरी ( जिगर फिटनेस , भुसावळ ) , मानाचा पट्टा , श्री किताब रोख रू . ११००० / – , कायमस्वरूपी मोठा करंडक , स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले . बेस्ट पोझर किताब विजेता- करन विलास पाटील ( तिवारी फिटनेस , एरंडोल ) , मानाचा पट्टा , रोख रू . ३००० / – , स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले . मोस्ट इम्प्रुड बॉडिबिल्डर्स पुरस्कार – अनिस शेख ( श्री साई बजरंग जिम , जळगांव ) , मानाचा पट्टा , रोख रू .१५०० / – , स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले . स्पर्धेचे बक्षीस वितरण जळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहन चव्हाण, ईश्वर सोनार, संदीप पाटील, प्रशांत पाटील, अक्षय गरुड, राहुल चौधरी, दिनेश महाजन व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत अनेक ठिकाणाहून ११० स्पर्धकांनी सहभाग घेतला पंच म्हणून राजेश बिऱ्हाडे, नासिर शेख, भैय्या पाटील, अक्षय चव्हाण यांनी काम पाहिले. स्टेज मार्शल म्हणून प्रशांत तायडे, किरण ठाकूर, धीरज जाधव यांनी कामकाज पाहिले. यावेळी मोहन चव्हाण, ईश्वर सोनार, दिनेश महाजन, हर्षल ब्रम्हे, राजेश बिऱ्हाडे, राजेंद्र काळभोर, अक्षय चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.