जळगाव जिल्हा

मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी 95 रुग्ण पनवेलला रवाना ! मंत्री गुलाबभाऊंनी केली रुग्णांचे विचारपूस !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२४ । पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून जीपीएस मित्र परिवार व शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने चिंचोली येथे मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कुसुंबा, चिंचोली, धानवड, उमाळे, रायपूर, कंडारी, वराड, जळके, विटनेर, शिरसोली येथील नागरिक तपासणीसाठी आले होते. यावेळी 500 रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच यातील 95 रुग्णांना गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पनवेल येथे रवाना करण्यात आले.

चिंचोली येथील साईबाबा मंदिरात जीपीएस मित्र परिवारातर्फे व शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कुसुंबा, चिंचोली, धानवड, उमाळे, रायपूर, कंडारी, वराड, जळके, विटनेर, शिरसोली येथील नागरिक नेत्र तपासणी व ऑपरेशनसाठी आले होते. यावेळी 500 रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि 95 रुग्णांना मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पनवेल येथे रवाना करण्यात आले आहे. रुग्णांना पनवेल येथे पाठवीत असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णांची विचारपूस केली.

यांची होती उपस्थिती?
याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवराज पाटील, धरणगाव तालुका प्रमुख शमुकुंदराव नन्नवरे, शिवसेना उपतालुका प्रवीण परदेशी, उपतालुकाप्रमुख राजू पाटील, तालुका समन्वयक देविदास कोळी, युवासेना उपतालुका प्रमुख अतुल घुगे, जेष्ठ शिवसैनिक नारायण अप्पा, धानवडचे सरपंच संभाजी पवार, चिंचोलीचे सरपंच किरण घुगे, ज्येष्ठ शिवसैनिक कैलास बिराडे, ग्रा पं सदस्य जीतू पोळ, ग्रा पं सदस्य हरीलाल शिंदे, उपसरपंच संजय राठोड, नाना पवार, बबलू देशमुख, योगेश सोनवणे, भाजपचे विलास घुगे, प्रवीण पाटील, विलास सोनवणे, आकाश पाटील युवा सेना यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button