दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू, पाचोऱ्यातील दुर्दैवी घटना

ऑगस्ट 29, 2024 1:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२४ । दहीहंडी फोडताना पाचोरा येथून एक दुर्दैवी घटना घडली आहे. दहीहंडीवेळी थरावर थर लावण्याच्या प्रयत्नात एक गोविंदा गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान जखमी झालेल्या या गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नितीन चौधरी असं मृत्यू झालेल्या गोविंदाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अशामध्ये नितीनच्या कुटुंबीयांना मदत केली जावी अशी मागणी केली जात आहे.

New Project 19

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथे दहीहंडीवेळी थरावर थर लावण्याच्या प्रयत्नात एक गोविंदा गंभीर जखमी झाला होता. या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नितीन चौधरी असं या मृत्यू झालेल्या गोविंदाचे नाव आहे. नीतीन पाचोरा शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील रिक्षा स्टॉपवर आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीमध्ये सहभागी झाला होता. दहीहंडी फोडण्यासाठी नितीन सहभागी असलेल्या गोविंदा पथकाने थरावर थर लावण्यास सुरूवात केली होती.

दहीहंडी फोडण्यासाठी थर लावत असताना नितीनचा पाय घसरला आणि तो खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. गंभीर जखमी झालेल्या नितीनला उपाचरासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नितीन रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. अशामध्ये कुटुंबीयांनी मदतीची मागणी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now