---Advertisement---
चोपडा

माजी सैनिकाला पोलिसांकडून मारहाण, खासदार रक्षा खडसेंनी घेतली भेट

---Advertisement---

Chopada News-जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । चोपडा येथे भाजपातर्फे रविवारी रोजी विविध श्री गणेश मित्र मंडळाचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त खासदार रक्षाताई खडसे या देखील उपस्थित होत्या. दरम्यान, चोपडा शहर येथील उपजिल्हा जिल्हा रुग्णालयास रात्री १०वा भेट देऊन, पोलिसांद्वारे मारहाण होऊन जखमी झालेले माजी सैनिक पंकज पाटील घुमावल बु. यांची यांनी भेट घेऊन, त्यांच्याशी संवाद साधला तसेच सदर घटनेची माहिती घेऊन, चोपडा तालुका आजी-माजी सैनिक सेवा भावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन स्विकारले व योग्य ती कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणे बाबत आश्वासन दिले..

jalgaon 42

यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, जिल्हाउपाध्यक्ष राकेश पाटील, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र मराठे, भाजयुमो जिल्हा चिटणीस मनोज सनेर, रावेर महिला आघाडी अध्यक्षा रेखा बोंडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, भरत तालुका चिटणीस भरत सोनगिरे, विधानसभा सोशल मिडीया प्रमुख मिलिंद वाणी,मिलिंद तात्या सोनवणे,अनु.ज.जिल्हा सरचिटणीस दीपक बाविस्कर, सैनिक सुनिल गंगाराम पाटील,आदि सेवानिवृत्त सैनिक बांधव,आदि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---