अबबब…वीजेचं कनेक्शन नसतानाही शेतकऱ्याला आले दीड लाखाचे बिल

सप्टेंबर 14, 2021 12:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२१ । रायपूर येथील एका शेतकऱ्याला महावितरणचं चक्क दीड लाख रुपयाचे वीज बिल आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नियमानुसार वीज जोडणीसाठी लागणारे सर्व शुल्क भरूनही महावितरणने सात वर्षांपासून जोडणी न करता शेतकऱ्याला चक्क दीड लाख रुपयाचा शॉक दिला आहे. यामुळे महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

farmer 1

याबाबत असे की, तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी दिलीप कडू धनगर यांची रायपूर गावाला लागून गट नंबर १०३-१ मध्ये स्वत: च्या मालकीची शेती आहे. या शेतात त्यांनी २०१४ साली बोअरवेल केली होती. बोअरवेलचे पाणी उपसण्यासाठी दिलीप धनगर यांनी महावितरणच्या चिंचोली येथील कार्यालयाकडे वीज जोडणी मिळण्याबाबत लेखी अर्ज केला होता. अर्जानंतर वीज पुरवठा मिळण्यासाठी धनगर यांनी २५ मार्च २०१४ रोजी ७ हजार रुपये इतकी डिमांड रक्कमही महावितरणकडे भरली होती. मात्र, सात वर्षे उलटल्यानंतरही महावितरणने धनगर यांना वीज जोडणी मिळाली नाहीच, मात्र त्यांच्या हाती तब्बल १ लाख ५४ हजार ९७० रुपयांचे वीज बिल पडलं आहे.

त्यामुळे महावितरणचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. शेतात वीज जोडणी नाही, मीटर नाही, त्यामुळे हे बिल कसे आले, याबाबत दिलीप धनगर यांनी अनेकवेळा महावितरणच्या रायपूरजवळील चिंचोली कार्यालयात तक्रारी केल्या. मात्र, अद्यापही धनगर यांचे देण्यात आलेल्या बिलाचे कारण सांगण्यात आलेले नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now