जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । एरंडोल शहराचे जवळपास आठ ते दहा वर्षापासून हद्द वाढ झाली आहे. वाढीव क्षेत्रामधील रहिवाशांकडून घरपट्टी व पाणीपट्टी नगरपालिकेकडून वसूल केली जाते मात्र, गटारी व पक्के रस्ते या मूलभूत सुविधांची बोबाबोंब असल्यामुळे वसाहतीमधील रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे आम्हाला फक्त रस्ते व गटारी या सुविधा कधी पुरवण्यात येतील असा सवाल रहिवाशांकडून केला जात आहे.
एरंडोल येथे पदमाई पार्क, आनंदनगर, गुरुकुल कॉलनी, इंद्रप्रस्थ कॉलनी, ओम नगर, अष्टविनायक कॉलनी, आदर्श नगर, मधुकर नगर, नम्रता नगर, हनुमान नगर या नवीन वसाहती तसेच म्हसावद रस्त्याकडे काही नवीन वसाहती या अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. वास्तविक शहरातील रहिवाशांना प्राथमिक सुविधा पुरवण्यासाठी नगरपालिकेकडे पालकत्व असून सुविधा पुरवण्याची या संस्थेची जबाबदारी आहे. शहराच्या वाढदिवसाच्या मंजुरी मिळून इतकी वर्षे लोटली तरी अजूनही रहिवाशांना पुरेशा प्रमाणात प्राथमिक सुविधा का पुरवल्या जात नाही असा संतप्त सवाल केला जातो विशेष हे की, काही नवीन कॉलनीमध्ये पक्के रस्ते करण्यात आले पण त्या कॉलनी अस्तित्वात येण्याच्या आधीच्या कॉलन्यानवर अन्याय केला जातो असा आरोप केला जात आहे.