एरंडोलला ‘हर घर तिरंगा’ अभियानाबाबत आढावा बैठक!

ऑगस्ट 5, 2022 10:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । एरंडोल येथे नगरपालिकातर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याबाबत गणेश मंडळे सामाजिक संस्था, विविध राजकिय पक्षांचे पदाधिकारी, महिला मंडळ, व्यापारी असोसिएशन, डॉक्टर्स, उद्योजक यांची आढावा बैठक आयोजीत करण्यात आली. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक घरावर तसेच शासकीय व निम शासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था या इमारतींवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयं स्फूर्तीने करण्यात यावी, असे आवाहन नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक विकास नवाडे यांनी केले.

jalgoan 17 jpg webp

शहरातून भव्य रॅलीचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले आहे. तसेच वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला बचत मेळावा, विविध स्पर्धांचे आयोजन करण्याच्या निर्णय घेण्यात आला. हर घर तिरंगा फडकवण्यासाठी नगरपालिकेतर्फे तिरंगा स्टॉल लावण्यात येणार आहे. या स्टॉलवर सशुल्क देऊन शहरातील नागरिकांनी तिरंगा खरेदी करण्याबाबत आश्वासित करण्यात आले.

Advertisements

या आढावा बैठकीसाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे, माजी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी, जयश्री पाटील, नरेंद्र पाटील, प्रसाद दंडवते,नरेश डागा, भास्कर जोगी. विवेक ठाकूर, गणेश महाजन, बी. के. धुत जहीरोद्दीनशेख कासम रविद्र शांताराम महाजन, अशोक चौधरी, शालीग्राम गायकवाड ज्ञानेश्वर महाजन, कैलास महाजन कार्यालय अधिक्षक हितेश जोगी. डॉ. अजित भट, देवेंद्र शिंदे, डॉ. योगेश सुकटे आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now