जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । एरंडोल येथे नगरपालिका स्तरावर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत फेरीवाल्यांना सहाय्य या उपघटकांतर्गत नगर पथविक्रेता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे हे होते.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल संदीप पाटील सौरभ बागड प्रशांत महाजन विजय गोरखा दत्तात्रय भोई राजेंद्र महाजन मीराबाई चौधरी लताबाई चौधरी रश्मी दंडवते सचिन विसपुते हे उपस्थित होते. महेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.











