---Advertisement---
एरंडोल

एरंडोलला आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२२ । जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन व क्रिडा प्रबोधिनी एरंडोल यांच्यातर्फे एरंडोल येथील काबरे विद्यालयाच्या प्रांगणात आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा २८ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.स्पर्धेचे उद्घाटन क्रिडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

jalgaon 2022 10 25T124944.472

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. चिमणराव पाटील व खा. उन्मेष पाटील, क्रीडांगण पूजन मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते तर नाणेफेक आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला विविध सामाजिक,राजकीय तथा क्रिडाक्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समारोप दि.३० ऑक्टोबर रोजी होऊन बक्षिस वितरण आमदार चिमणराव पाटील, अधिकारी,डॉक्टर यांच्या तथा विविध मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---