जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । एरंडोल येथे तालुका माहेश्वरी महिला मंडळातर्फे बुधवारी एक दिवशीय गृह उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ख्यातनाम उद्योजक तथा बालाजी ऑइल मिलचे संचालक शांतनू काबरा व अनिता काबरा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक पंकज काबरा हे होते प्रमुख अतिथी म्हणून सुनील मानुधने, कल्पेश कलंत्री, मधुलिका बेहेडे, उज्वला राठी हे उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महेश पूजन करण्यात आले. यावेळी जळगाव, भुसावळ, अकोला व स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी खानपान, साडी डिझाईनींग,दिवे तोरण, इव्हेंट मँनेजमेंट विविध प्रकारच्या कार्यक्रम वेळेस वेगवेगळे कश्या प्रकारे कार्यक्रम करावे या विषयी माहिती देणारे असे स्टॉल लावले होते. या उपक्रमात महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना लड्डा यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बियाणे यांनी केले डॉक्टर राखी काबरा यांनी आभार प्रदर्शन केले मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख विद्या काबरा, मीरा जाखीटे, वर्षा बियाणी, ज्योती पांडे, नम्रता जाखीटे, ममता बिर्ला आदी महिलांनी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.