जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । मोबाइल कंपन्यांनी शेत जमीन महसुलाची थकीत रक्कम न भरल्याने तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या आदेशानुसार महसूल पथकाने तालुक्यातील एरंडोल व जानफळ येथील मोबाइल टॉवर सील केले आहेत.

जानफळ येथील इंडस कंपनीकडे शेतजमीन महसुलाची ५८ हजार ९७ रुपये थकबाकी असल्यामुळे तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा जमीन महसूल पथकातील मंडळ अधिकारी मनोज शिंपी, तलाठी बालाजी लोंढे यांनी कोतवाल, पोलिस पाटील व उपसरपंच यांच्या उपस्थितीत मोबाइल टॉवर सील केले. तसेच एरंडोल येथील आयडिया कंपनीचा मोबाइल टॉवर शेत जमीन महसुलाची थकबाकी ३६ हजार ८४० रुपये न भरल्यामुळे मंडळ अधिकारी यु. बी. निंबाळकर, शहर तलाठी सलमान तडवी व कोतवाल यांनी सील केला. थकबाकी भरून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी केले आहे.

- कर्जमाफी योजनेतून जळगाव जिल्ह्यातील तब्बल ‘इतके’ हजार शेतकरी अपात्र?
- प्रवाशांना दिलासा ! जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ
- जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त जळगाव पोलिसांची पत्रकारांसाठी छायाचित्र स्पर्धा
- शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी जामनेरचे भाजप नेते संजय गरुडांना अटक ; जळगाव शिक्षण वर्तुळात खळबळ
- जळगावात चातुर्मास पर्वाला आजपासून प्रारंभ







