⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | पाचोऱ्यातील युवकांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश

पाचोऱ्यातील युवकांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२३ । पाचोरा तालुक्यातील कोल्हे, भोकरी, शिंदाड,सर्वे पिंपरी येथील युवकांचे वैशाली सुर्यवंशी यांनी भगवा रुमाल घालून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल करून घेतला. हा कार्यक्रम शिवसेना मध्यवर्ती कार्यालय पाचोरा येथे संपन्न झाला.

पक्षप्रवेश सोहळ्याच्या मार्गदर्शन करताना वैशाली सुर्यवंशी म्हणाल्या की, आपण शिवसेना पक्षातील कुटुंबाचे सदस्य झालात याचा मला मनापासून आनंद वाटतो म्हणून तुम्ही सर्वांचे मनापासून अभिनंदन करते स्वागत करते. आपण सर्वांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 80% समाजकारण व 20%राजकारण हा महामंत्र ध्यानी घेऊन गोरगरीब मायबाप जनतेची सेवा करावी नूतन राशन कार्ड गरजूंच्या स्वस्त धान्य पुरवण औषधोपचार विधवा घटस्फोटीत अपंग श्रावणबाळ निराधार योजनेत पात्र लाभार्थ्यांना मदत करा त्यांचे प्रकरणे दाखल करा मतदार नोंदणी करून घ्यावी, जनता जनार्दन च्या समस्या सोडविण्यासाठी तथा त्यांच्या सुखात दु:खात सहभागी व्हा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. शिवतीर्थ शिवसेना कार्यालय तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे व्यसनापासून दूर राहा निरोगी व आनंदी जीवन जगा आपल्या हातून समाजाची सेवा घडावी.

या कामे आई भवानी आपणास उदंड आयुष्य व बलदंड शक्ती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. प्रवेश करणारे मानकरी मंगेश तडवी, गोलू लोहार, संतोष पाटील, रवी पाटील, रहमान तडवी, बाबुराव पाटील, चेतन दळवी, अशोक पाटील, ईश्वर माळी, अनुदिन तळवे, लुकमान तळवे, बबलू मांडवी, आमीन तडवी, शाहरुख तडवी, संजय जाधव संतोष पाटील, शिवाजी गोपाळ, गोपाळ पाटील, शाहरुख तळवी, अमोल तळवी, चेतन तळवी, योगेश सावळे, अफसर कहाकर, अरफाक कहाकर, सरफजखा कहाकर, तौसीफ कहाकर, अनाज कहाकर, जाकीर कहाकर, अजीम कहाकर, अफसर कहाकर, निलेश साठे, सागर चौधरी, तुषार भोई, सुनील भोई, नयन भोई, मनोज भोई, विनोद भोई, दीपक बागुल, समीर तळवी, अलाउद्दीन तळवी आदी नवयुवकानी स्वयंस्फूर्तीने पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील यांनी मार्गदर्शन केले तालुकाप्रमुख शरद पाटील, पप्पू राजपूत, भरत खंडेलवाल, शशी पाटील, धनराज पाटील, भगवान पाटील, अरुण तांबे, रितेश जैन, दीपक पाटील, गौरव पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, गणेश पाटील, संदीप पाटील, किरण राजपूत, प्रशांत राजपूत, शुभम महाजन, उमेश राजपूत, निलेश पाटील, डीडी नाना, राजीव गायकवाड, धरमसिंग पाटील, गोकुल गांगुर्डे, आदी मान्यवर उपस्थित होते प्रस्ताविक संचालन आभार नाना वाघ यांनी केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.