जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२२ । माजी मंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे उद्या शनिवारी (दि. २०) जळगाव जिल्हा दौर्यावर येत आहेत. पाचोरा, धरणगाव व पारोळा येथे त्यांचा संवाद कार्यक्रम होणार आहे. मात्र त्यांच्या दौर्याआधीच शिवसेनेला जिल्ह्यात खिंडाळ लागलं आहे. अमळनेरच्या शहरप्रमुखांसह विविध महत्वाच्या पदाधिकार्यांनी आज आपापल्या पदांचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाली आहे. त्यानंतर शिवसेनेचे एक-एक करत शिंदे गटात प्रवेश करीत आहे. जळगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र येथील शिवसेनेचे पाचही आमदार शिंदे गटात असल्याने हा शिवसेनेला आधीच मोठा धक्का होता. यात गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देखील घेतली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध पदाधिकारी हे शिंदे गटात दाखल होत आहेत. यात आज अमळनेर तालुक्यातील पदाधिकार्यांनी आपापले राजीनामे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याकडे सुपुर्द करून ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
अमळनेर येथील शिवसेनेचे शहर प्रमुख संजय कौतिक पाटील व तालुका संघटक महेश देशमुख यांनी आज महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या सोबत अमळनेर तालुका सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष व लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील यांनीही प्रवेश घेतला आहे. तत्पूर्वी शहर प्रमुख संजय पाटील व तालुका संघटक महेश देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांचेकडे सादर केला. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश केल्याची जाहीर केले .गुलाब भाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी संजय कौतिक पाटील व महेश देशमुख ,लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.