जळगाव जिल्हाराजकारण

भडगाव तालुक्यातील लोणपिराचे येथील शेकडो जणांचा ठाकरे गटात प्रवेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाली आहे. मात्र अशातच तालुक्यातील लोणपिराचे येथील माजी सरपंच अशोक पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश घेतला.

एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू होत असतांनाच पुन्हा तालुक्यात मोठा प्रवेश सोहळा पार पडला आहे. यात माजी सरपंच व सार्वजनीक वाचनालयाचे अध्यक्ष तसेच विजय दुध उत्पादक सोसायटीचे अध्यक्ष अशोक पाटील यांच्यासह गावातील शेकडो स्त्री-पुरूषांनी हातात भगवा घेत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी वैशाली सुर्यवंशी यांनी त्यांचे स्वागत करत आगामी काळातील संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. तर या प्रवेश सोहळ्यामुळे परिसरात पक्षाची ताकद वाढल्याचे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले. याप्रसंगी उपस्थितांनी जय महाराष्ट्र तसेच वैशाली सुर्यवंशी यांच्या समर्थनार्थ केलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमल्याचे दिसून आले.

यांची होती उपस्थिती?
याप्रसंगी पंडित पाटील यांच्यासह किशोर पाटील, विरभान पाटील, शांताराम पाटील, भूषण पाटील, दीपक पाटील, वाल्मीक पाटील, विलास पाटील, विशाल पाटील दिपक वसरकर, वैशाली पाटील, अनिता पाटील, कल्पना पाटील, जागृती पाटील, उषा पाटील, प्रतिभा पाटील व कल्पना पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती. या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला अरूण पाटील, गणेश परदेशी, मनोहर चौधरी, बाळू पाटील, दिपक पाटील, रतन परदेशी, पप्पूदादा, जे. के. पाटील तसेच रतन परदेशी, गोरखदादा, पप्पूदादा, बाळू पाटील, विजय साळुंखे, राजू मोरे, अशोक पाटील, दत्तू मांडोळे, योजना पाटील, अनिल महाजन, पंडित माळी, राजू चव्हाण, दिनेश टेलर,चेतन पाटील,एकनाथ फुलारा, वाल्मीकदादा, बाळूतात्या, युवराज पाटील, पंडित महाजन, रावसाहेब पाटील, किशोर पाटील, फकिरा पाटील पत्रकार-निलेश पाटील, अमीन पिंजारी, संजय महाजन यांच्यासह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button