---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

उघड्या घरात प्रवेश करीत लॅपटॉप, मोबाईल लांबवला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२२ । शहरातील जयकिसनवाडीतील संजीवनी अपार्टमेंटमधील उघड्या घरातून लॅपटॉप आणि मोबाईल असा एकुण ३८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल आहे.

chori mobile and bag 1

जयकिसनवाडीत असलेल्या संजीवनी अपार्टमेंटमध्ये मनोज रामकृष्ण झोपे (वय-५३) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. वकीलीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार दि.१८ मार्च रोजी सकाळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात घसून घरातील ३० हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप आणि ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल असा एकुण ३८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेण्याचा प्रकार समोर आला आहे.

---Advertisement---

चोरट्याने उघड्या घरात प्रवेश करीत लॅपटॉप आणि मोबाईल लंपास केला आहे. याबाबत मनोज झोपे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजय निकुंभ हे करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---