⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

भागलपूर एक्स्प्रेसमध्ये विक्रेत्याची दादागिरी, टीसीला चाकूने भोसकण्याची धमकी

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२२ । एलटीटी-भागलपूर एक्स्प्रेसमध्ये विशेष तिकीट तपासणी करणारे मुख्य तिकीट निरीक्षकानी गाडीत अस्वच्छता करणाऱ्या शेंगदाणे विक्रेत्याला तिकिटाबाबत विचारले. यावेळी त्याने थेट ‘माझ्या नांदी लागल्यास चाकूने भोसकून खून करेल’ अशी धमकी दिली. ही घटना रविवारी (दि.१६) दुपारी ३.२० वाजता घडली. या प्रकरणी तिकीट निरीक्षकांच्या फिर्यादीवरून अ‌वैध विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यास आरपीएफ, जीआरपी पाेलिसांनी अटक केली.

एलटीटी-भागलपूर एक्स्प्रेसमध्ये रविवारी विशेष तिकीट तपासणी सुरू हाेती. त्यात मुख्य तिकीट निरीक्षक दिनेश वसापा यांनी गाडीतील बी-२ या बोगीत अस्वच्छता करणाऱ्या शेंगणादे विक्रेत्याकडे तिकिटाबाबत विचारणा केली. यावेळी विक्रेता शेख जमीर शेख लतिफ (रा.बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) याने, माझ्या नांदी लागल्यास चाकूने भोसकून खून करेल अशी धमकी दिली. नंतर धाेक्याची साखळी (एसीपी) ओढून गाडी थांबताच पलायन केले. याप्रकरणी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल झाला.

हे देखील वाचा :