माझी शिवसेना संपवून दाखवाच : उद्धव ठाकरे यांचे भाजपाला आव्हान
जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२२ । भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसेना संपत आलेला पक्ष आहे असे विधान नुकतेच केले होते. यावेळी ते म्हणले होते कि, संपूर्ण देशात केवळ भाजपा पक्ष राहणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असं नड्डा म्हणाले होते. मात्र, त्यांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करूनच पाहावा असं आव्हान आता उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिले आहे.
यावेळी ठाकरे म्हणाले कि, महाराष्ट्रात शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असं नड्डा म्हणतात. मात्र, त्यांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करूनच पाहावा. राष्ट्रवादी कुंटुंबाचा पक्ष, काँग्रेस भाऊ-बहिणीचा पक्ष असून भाजपाला वंशवादाविरोधात लढायचं असं ते म्हणतात, पण भाजपाचा वंश कोठून सुरू झाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
संजय राऊतांबद्दल मला अभिमान आहे. तुमच्याकडे बळ आहे म्हणून तुम्ही इतरांना संपवत असाल तर दिवस कायम राहत नाहीत. दिवस फिरतील तेव्हा नड्डा काय करणार? संजय राऊत यांचा गुन्हा काय आहे? ते निर्भिड पत्रकार आहेत. ते मरेन पण शरण जाणार नाही असं म्हटलेत.” मला राऊतांच्या अभिमान आहे असे ठाकरे म्हणाले.