⁠ 
शनिवार, मे 18, 2024

मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार : म्हणाले.. यापुढे असेच सहकार्य राहू द्या!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । राज्यातील सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आपला वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. राज्याच्या मंत्रीमंडळाची बैठक बुधवारी मंत्रालयात पार पडली. बैठकीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे अनुपस्थित राहिले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली. बैठक संपल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना ‘यापुढे असेच सहकार्य राहू द्या’ असे आवाहन केले आहे. ठाकरे यांच्या या वक्तव्याचे अनेक अंदाज बांधले जात असून ते सायंकाळी काहीतरी मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे जेष्ठ नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे हे ४६ आमदार घेऊन आपला वेगळा गट स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राज्यातील सरकार कोसळणार असल्याचे म्हटले जात असून शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी ट्विट करीत राज्यातील विधानसभाची वाटचाल बरखास्तीच्या दिशेने असल्याचे म्हटले आहे. राऊत यांच्या ट्विटमुळे आज सायंकाळपर्यंत मुख्यमंत्री राजीनामा देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले काही मंत्री आणि आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे वृत्त सकाळपासून समोर येत असून हळूहळू एक एक आमदार नॉट रिचेबल होत आहेत. खा.संजय राऊत यांनी याबाबत एक ट्विट केले असून विधानसभा वाटचाल बरखास्तीच्या दिशेने असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : Eknath Shinde in Guwahati : एकनाथ शिंदे सायंकाळी बैठक घेऊन जाहीर करणार भूमिका, म्हणाले..

नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी १ वाजता कॅबिनेटच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रालयात दुपारी बैठक सुरू झाल्यावर अनेक मंत्री अनुपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने ते ऑनलाईन पद्धतीने बैठकीला हजर झाले तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे गैरहजर होते. काँग्रेस नेत्याने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चेहरा बैठकीत हसतमुख होता. उद्धव ठाकरे यांनी बैठक संपताना सहकारी मंत्र्यांना यापुढे असेच सहकार्य राहू द्या असे आवाहन केले आहे. ठाकरे यांच्या वक्तव्याचे अनेक अंदाज बांधले जात असून सायंकाळी ते काय निर्णय जाहीर करणार याकडे लक्ष लागून आहे.