---Advertisement---
बोदवड

बोदवड नगरपालिकेने काढले सार्वजनीक जागेतील अतिक्रमण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । बोदवड तालुक्यातील जामठी रोडवर हिरवा तलावाला लागुन असलेल्या सार्वजनीक जागेत दुकान (टपरी) ठेवल्या होत्या. सदर अतिक्रमण दि. ७ रोजी बोदवड नगरपालिकेतर्फे औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १७९ नुसार काढण्यात आले.

bodvad 2 jpg webp

बोदवड नगरपंचायत मार्फत दुकान मालकांना २४ तासाचे आत अतिक्रमण काढून जागा मोकळी करावी असे नोटीस देण्यात आले होते. तसे न केल्यास नगरपंचायत स्वखर्चाने अतिक्रमण काढून टाकेल व त्यासाठी येणारा खर्च आपणाकडुन नगरपंचायत अधिनियमानुसार वसुलीची कार्यवाही करण्यात येईल. याकामी कोणतेही आर्थीक नुकसान झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी दुकान मालकाची राहील, याची नोंद घ्यावी. असे नोटिशीद्वारे सूचित करण्यात आले होते तरी देखील नागरिकांनी दुकान (टपरी) न काढल्यामुळे नागरपंचायती मार्फत अतिक्रमण काढण्यात आले. या वेडेस नागरिकांमध्ये एकाच रोष होता की गोर गरीब लोकांचेच का नेहमी हाल होतात. बोदवड शहरामध्ये धमधकड्या पुढारी वर्गाचे अतिक्रमण का नाही लिघाले? सारंगी तलाव ते हिरवतालाव बोदवड पोलिसस्टेशन मागील नाल्याचे साफ सफाई करताना का अतिक्रमण का काढले नाही? असे प्रश्न उपस्थित करीत प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---