नशिराबाद टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पुकारले कामबंद आंदोलन

फेब्रुवारी 17, 2022 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । नशिराबाद टोल प्लाझावरील कामगारांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना व टोल प्लाझा कामगार यांनी काम बंदचा पवित्रा घेतला आहे.

aandolan jpg webp

पगार वेळेवर न देणे, कुठल्याही प्रकारचा भत्ता न देणे तसेच दादागिरीची भाषा करणे असे प्रकार सुरू असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. या विरोधात बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व कामगारांनी आंदोलन पुकारले. जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिला. मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, शहराध्यक्ष जितेंद्र बराटे शहर सचिन भालेराव, गोकुळ धनगर, सचिन भालेराव, गजेंद्र माळी, केतन बोंडे, समाधान सोळुंके, गजानन मराठे, लोकेश लोखंडे, मयूर झटके, दीपक जंगम, गिरीश चौधरी, भावेश रोटे आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now