गुन्हेपाचोरा

पाचोरा पीपल्स बँकेत खोटे अन् बनावट दस्तऐवज तयार करून अपहार; गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । पाचोरा येथील पीपल्स बँकेत सन २०११ ते १६दरम्यान तत्कालीन सहाय्यक निबंधकांनी दाेन फर्मच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे व खाेेटी बिले दाखवून १० लाख २० हजारांचा अपहार केल्याप्रकरणी पाचाेरा पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे बँकिंग व सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, पाचोरा येथील दी पीपल्स बॅँकेचे सन २०११-१२ ते सन २०१५-१६ दरम्यान शहरात निवडणुकीदरम्यान सहाय्यक निबंधक प्रताप बाबा पाडवी हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त हाेते. त्यावेळी त्यांनी जळगाव येथील आदर्श नगरमधील श्री समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स व जळगाव येथील गाेलाणी मार्केटमधील कपिल प्रिंटर्सचे विलास जाेगेंद्र बेंडाळे यांच्याशी संगनमत करुन वेळाेवेळी बँकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट दस्तावेज तयार केले. हे दस्तावेज खरे असल्याचे भासवून कपिल प्रिंटर्सच्या नावाने २ लाख ६ हजार ४२५ रुपये, समर्थ टूर अँड ट्रॅव्हल्स नावाने ४० हजार रुपये, सुपडू भादू प्राथमिक शाळेची इमारत भाड्याने दाखवून ६२ हजार २०० रुपयांचे बिल तसेच खाेटे दस्तावेज व बनावट बिले दाखवून ६ लाख ५० हजार रुपये बँक खात्यातून राेखीने काढून घेतले. अशा पद्धतीने बनावट कागदपत्रे व खाेटी बिले दाखवून १० लाख २० हजार ६२५ रुपयांचा अपहार केल्याचे पंकज श्रावण साेनार (पुणे) यांनी पाचाेरा पाेलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पंकज सोनार यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसांत तत्कालीन सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी, समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स, कपिल प्रिंटर्स यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे करत आहेत.

Related Articles

Back to top button