दुर्दैवी घटना ! रिक्षातून पडल्याने अकरावीची विद्यार्थिनीचा मृत्यू

मार्च 25, 2022 11:00 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२२ । बोदवड (Bodwad) तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. कॉलेज सुटल्यावर घरी शेलवड (ता.बोदवड) जाताना रिक्षातून पडल्याने १७ वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली होती. जखमी अवस्थेत जळगावला नेत असताना तिचा रस्त्यात मृत्यू झाला. तृप्ती भगवान चौधरी (Trupti Chaudhari) असं मृत मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

trupti chaudhari jpg webp

नेमकी काय आहे घटना?

तृप्ती चौधरी ही विद्यार्थिनी बोदवड येथील न.ह.रांका कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेला आहे. कॉलेजची वेळ सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत असल्याने ती नेहमीप्रमाणे गुरुवारी शिक्षणासाठी आली. कॉलेज सुटल्यानंतर मैत्रिणींसोबत शेलवड येथे घरी आॅटोरिक्षाने निघाली. यावेळी ती पॅजिओ रिक्षाच्या पुढील सीटवर मैत्रिणीसोबत बाहेरील साइडने बसली होती.

बोदवडपासून दोन किमी अंतरावर अचानक हात निसटून तोल गेल्याने तृप्ती व तिची मैत्रीण रोहिणी राजेंद्र धनगर या दोन्ही धावत्या रिक्षातून खाली पडल्या. तृप्ती बाहेरच्या साईडने असल्याने तिच्या डोक्याला व मेंदूला गंभीर मार लागला. यानंतर तिला तातडीने बोदवड येथील डॉ.यशपाल बडगुजर यांच्या दवाखान्यात नेण्यात आले.

तर तृप्ती चौधरी वाचली असती…
विद्यार्थ्यांसाठी एसटी दिवसभरातून 21 फेऱ्या करायची. मात्र, कोरोनानंतर शाळा-महाविद्यालये सुरू होताच 8 नोव्हेंबरला एसटीचा संप सुरू झाला. परिणामी सर्व विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. अनेक खासगी वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त किंवा फ्रंट सीट बसवून वाहने चालवतात. याच पद्धतीने प्रवास करणे शेलवड येथील तृप्तीच्या चौधरीच्या जीवावर बेतले. कदाचित एसटीचा संप सुरू नसता तर ही दुर्घटना घडली नसती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now