Jalgaon : विद्युत निरीक्षकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२४ । विद्युत कामे करणाऱ्या परवानाधारक कंत्राटदाराकडून परवाना नूतनीकरणासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा विद्युत निरीक्षक गणेश नागो सुरळकर (५२, रा. पार्वती नगर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २७ रोजी सायंकाळी रंगेहाथ पकडले.
तक्रारदार हे परवानाधारक कंत्राटदार असून ते शासकीय विद्युतीकरणाचे कामे घेतात. परवाना नुतनीकरणासाठी त्यांनी खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा विद्युत निरीक्षक गणेश सुरळकर याच्याकडे अर्ज केला होता. त्यासाठी सुरळकर याने १५ हजारांची मागणी केली होती.
एसीबीचे उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, एन. एन. वाघ, सहाय्यक फौजदार दिनेशसिंह पाटील, सुरेश पाटील, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, अमोल सुर्यवंशी या पथकाने लाच घेताना पकडले.