बाजार करून परतणाऱ्या वृद्धाला बसने चिरडले ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

सप्टेंबर 25, 2025 4:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । बाजार करून आपल्या गावी परतणाऱ्या एका ८३ वर्षीय वृद्धाला भरधाव बसने चिरडल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे घडली. सुपडा निनू सोनवणे (वय ८३, रा. निमखेडी बुद्रुक, ता. मुक्ताईनगर) असे मयत वृद्धाचे नाव असून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

काय आहे घटना ?

मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथे वास्तव्यास असलेले सुपडा सोनवणे हे बुधवारी कुऱ्हाकाकोडा येथे बाजार असल्याने ते गेले होते. बाजार करून ते पायी घरी येत असताना त्यांना बस (एमएच २० बीएल १७७०) ने धडक दिली. धडकेमुळे सुपडा सोनवणे हे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या दुर्घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या अपघातामुळे निमखेडी बुद्रुक आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now