एकनाथराव खडसेंची गिरीश महाजनांवर पुन्हा टीका : वाचा काय म्हणाले खडसे
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२२ । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सभेला संबोधित करताना सरकारवर टीका केली. यावेळी खडसे म्हणाले कि, अर्थमंत्री टाळ्यांवर जीएसटी (GST) लावतील या भीतीने लोक टाळ्या वाजवत नाहीत, सभेवेळी जमलेले लोक टाळ्या वाजवत नव्हते यामुळे यावेळी खडसेंनी टीका केली.
एकनाथ खडसे अमरावतीत सभेला संबोधित करत होते. दिवाळीच्या एका रात्रीत 18 टक्क्यांनी महागाई वाढवण्यात आली. जीएसटी लावण्यात आला. त्यामुळे लोकांमध्ये जीएसटीची भीती आहे. जीएसटी लावतीलया भीतीने लोक टाळ्या वाजवत नाहीत, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.
महाराष्ट्रामध्ये 70 वर्षात कधी झालं नाही, एवढ्या खालच्या पद्धतीने राजकारण सध्या सुरु आहे असे यावेळी खडसे म्हणाले. 50 खोके सबकुछ ओके झालं आहे. मला मतदान करू नये म्हणून गिरीश महाजन देवेंद्र भुयार यांना फोन करत होते. असे खडसे म्हणले. काही आमदारांनी 50 खोके घेऊन मतदारसंघ विकून टाकला. ज्यांना आम्ही घडवतो, तेच आमच्या अंगावर बसतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.