⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

दिवाळी सेल : iPhone 13 फक्त 44 हजारात मिळविण्याची संधी, वाचा काय आहे फ्लिपकार्टची ऑफर

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२२ । नवरात्री आणि दसरा नंतर पुन्हा एकदा फ्लिपकार्टचा सेल सुरु झाला आहे. फ्लिपकार्टवर काही उत्पादने विशेषतः मोबाईलवर भरगोस सूट मिळत असून iPhone १३ केवळ ४३ हजार ९० रुपयात खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. इतकेच नव्हे तर नुकतेच लाँच केलेले Google Pixel 6a हा मोबाईल देखील ग्राहकांना केवळ १७ हजार २९९ रुपयात खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टचा सेल सुरु झाला असून उद्या दि.२३ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

फ्लिपकार्टच्या या ५ दिवसांच्या सेलदरम्यान, ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, इअरबड्स, स्मार्टवॉच आणि घरगुती आणि स्वयंपाकघरातील उपकरणांसह अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळेल. सेल दरम्यान, iPhone 13 पुन्हा एकदा ५० हजारांच्या खालील किमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्या सेलमध्ये आयफोन १३ हा सवलतीच्या दरात म्हणजेच ५९ हजार ९९० मध्ये उपलब्ध आहे. त्यावर ग्राहकांनी एक्सचेंज सवलत पूर्ण प्राप्त केली तर ती तब्बल १६ हजार ९०० रुपये मिळू शकणार आहे. याचाच अर्थ ग्राहकांना आयफोन १३ केवळ ४३ हजार ९० रुपयात खरेदी करता येणार आहे.

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मोबाईलवर अनेक सवलतीच्या भन्नाट ऑफर सुरु आहेत. त्यात Realme, Poco, Samsung, Oppo, Vivo, Apple iPhone, Xiaomi, Motorola, Google, Infinix, Micromax आणि Lava यासह विविध स्मार्टफोन उत्पादनांवर सवलत सुरु आहे. बिग दिवाळी सेलचा एक भाग म्हणून, ई-टेलर SBI बँक कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर 10 टक्के झटपट सूट देखील मिळणार आहे. तसेच पेटीएम वॉलेट आणि UPI वापरून केलेल्या व्यवहारांवर 10 टक्के कॅशबॅक आहे. सेलमध्ये नुकतेच लाँच करण्यात आलेला बजेट फोन Google Pixel 6a देखील ऑफरमध्ये उपलब्ध आहे. बिग दिवाळी सेलचा भाग म्हणून तो केवळ 17,299 रुपयात खरेदी करता येणार आहे.

Apple iPhone 13 आणि गुगल पिक्सेलचे फीचर्स
आयफोन 13 चा डिस्प्ले आकार 6.1-इंच आहे. कॅमेरामध्ये पूर्वीप्रमाणेच 12-मेगापिक्सेल वाइड आणि अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. जुन्याच्या तुलनेत नवीन कॅमेरा लेन्स सेटअपच्या तुलनेत मोठे सेन्सर देखील मिळतात. Google Pixel 6a मध्ये 6.14-इंचाचा OLED फुलएचडी+ डिस्प्ले आहे. डिव्हाइस Google Tensor द्वारे समर्थित आहे आणि ते 12-मेगापिक्सेल ड्युअल-कॅमेरा देखील देतात. फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सेल सेन्सरसह येतो. फोनमध्ये 4410 mAh ची बॅटरी असून फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.