⁠ 
सोमवार, मे 6, 2024

पवारांनी भाकरी फिरवली : सुप्रीया सुळे आणि प्रफुल पटेल राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष !

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२३ । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली असून सुप्रीया सुळे आणी प्रफुल पटेल कार्यकारी अध्यक्ष घोषित केले आहे. यामुळे पक्षात भाकरी फिरवावी लागेल असे म्हणणाऱ्या शरद पवारांनी आपला शब्द खरा करून दाखवला आहे.

शरद पवार यांचा राजकीय वारसदार कोण? अशी चर्चा गेल्या महिन्यात रंगली आहे यातच शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली असून सुप्रीया सुळे आणी प्रफुल पटेल कार्यकारी अध्यक्ष घोषित केले आहे.यावेळी अजित पवार यांच्याकडे कोणतीही जवाबदारी देण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र्र विधानसभा निवडणुकीची जवाबदारी हि सुप्रिया सुळे यांना देण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.

सुप्रियाताईं सोबत काम करणार
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना प्रफुल्ल पटेल म्हणाले कि, ‘ साहेबांनी जी जबाबदारी दिली ती आतापर्यंत पार पडली. यापुढेही ती जबाबदारी पार पडत राहणार. पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवून देण आणि पक्षाला यशाच्या शिखरावर नेणं ही माझी पहिली जबाबदारी असेल. पण सोबत सुप्रियाताईं सोबत काम करणार आहे. नवीन नेतृत्त्व तयार करण्यासाठी काम करणार आहोत. मला साहेबांनी जी जबाबदारी दिली ती पार पाडण्याच काम करत राहणार.

विरोधकांनी एकत्र येण्याची आवश्यकता
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले कि, . शेतकरी, दलित, महिला, आदिवासी, अल्पंसंख्यांची रक्षणासाठी आपला पक्ष उभा राहिला. काम करता करता २४ वर्षे पुर्ण झाले आणि आज २५ व्या वर्षात पदार्पण केले. पक्षाच्या आजच्या स्थितीसाठी हजारो जणांनी परिश्रम घेतले आहेत. आता देशात विरोधकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. २३ जून रोजी एकत्र येणार आहोत

जवाबदारींची विभागणी
खा.सुप्रिया सुळे – कार्यकारी अध्यक्षा. महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला युवा, लोकसभा यांच्या समन्वयाची जबाबदारी.
खा. प्रफुल्ल पटेल – कार्याध्यक्ष. मध्य प्रदेश, राजस्थान, गोव्याची जबाबदारी.
खा. सुनील तटकरे – राष्ट्रीय सरचिटणीस. ओडिशा, पश्चिम बंगाल, शेतकरी, अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी.
नंदा शास्त्री – दिल्ली प्रदेशाध्यक्ष.

अजित पवारांकडे कोणतीही जवाबदारी नाही !
राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे कोणतीही जवाबदारी देण्यात आलेली नाही. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलणे देखील टाळले आहे.