जळगाव जिल्हामुक्ताईनगर

एकनाथ खडसेंच्या गडावर फडकणार होता एकनाथ शिंदेंचा भगवा मात्र….

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । मुक्ताईनगर हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला. आणि याच बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे आपला भगवा फडकावणार होते. मात्र ऐन वेळेस उच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि कहानीमे ट्विस्ट झाला. आणि भगवा फडकता राहिला. मुक्ताईनगर येथे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत असतांनाच उच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त झाले व निवडणुकीला स्थगिती मिळाली.

मुक्ताईनगरच्या नगराध्यक्ष पदासाठी पियुष मोरे (महाजन) यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यांची निवड बिनविरोध निश्चित मानली जात होती.फक्त घोषणेची अधिकुत घोषणा बाकी होती. हि घोषणा होणार अशातच सर्वोच्च न्यायालयाचे निवड प्रक्रिया स्थगितीचे आदेश प्राप्त झाले.शिंदे गटाचा नगराध्यक्ष होणार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा लागली होती. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या माध्यमातून नगरपालिकेवर प्रभारी असलेल्या नगराध्यक्षांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि निकाल लांबला. उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानंतरच ही निवड प्रक्रिया पार पडेल अशी माहिती प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी दिली आहे.

पियुष मोरे हे भाजपकडून झाले. नंतर त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. आता मोरे सुद्धा शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचा मुक्ताईनगरच्या नगरपालिकेवर नगराध्यक्ष होणार होता. मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे सगळंच गणित फिस्कटलं

Related Articles

Back to top button