⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

शेंगांना मिळाला विक्रमी भाव : बळीराजा सुखावला !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेंगांना र्वाधिक प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. यंदा शेंगांना तब्बल ८३५० इतका भाव मिळाला बाजार समितीचे सचिव जगदीश लोधे यांनी बुधवार, १२ रोजी एका पत्रकान्वये माहीती दिली.(SHENGA PARTI KVINTAL BHAV)

एकेकाळी शेंगा या शेतीमालासाठी येथील बाजार समिती प्रसिद्ध होती. परंतु काळानुरूप शेती पिकांमध्ये बदल होत गेले आणि शेंगांची आवक कमी झाली. कांदा कापूस या नगदी पिकांकडे शेतकरी बांधवांचा कल वाढला. परंतु कांदा व कापूस या नगदी पिकांचीही हमी नसल्यामुळे काही शेतकरी बांधव शेंगा हे पीक घेतात. त्यापासून गुरांना पाला मिळतो, म्हणजेच गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटतो.

बुधवारी,बाजार समितीमध्ये शेंगा या शेतमालाला विक्रमी प्रतिक्विंटल ८३५० रुपये भाव मिळाला यामुळे बळीराजा आनंदी झाला आहे. तालुक्यातील शेतकरी बांधवांनी भुईमूग शेंगा शेतीमाल बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड व संचालक मंडळाने केले आहे.