⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

 Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की….

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ ।  एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज महाराष्ट्राच्या ३०व्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. याच बरोबर फडणवीस यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घातली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यावर भाजप आणि एकनाथ शिंदे गट सरकार स्थापन करण्याच्या तयारीत होता. एकनाथ शिंदे दुपारी मुंबईत दाखल झाले. शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली त्यानंतर सायंकाळीच ७.३० वाजता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली.

एकनाथ संभाजी शिंदे
जन्म : 6 मार्च 1964.
जन्म ठिकाण : अहिर, तालुका-महाबळेश्वर, जिल्हा-सातारा.
शिक्षण : बी.ए.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती लता. अपत्ये : एकूण 1 (एक मुलगा).
व्यवसाय : उद्योग व सामाजिक कार्य. पक्ष : शिवसेना.
मतदारसंघ : 147 -कोपरी-पाचपाखाडी, जिल्हा-ठाणे.
भाजपच्या उमेदवाराला 89 हजार 300 मतांनी हरवून विजयी
शिंदे यांना पडलेली मतं – 1 लाख 13 हजार 495
भाजपच्या संजय घाडीगावकर यांना पडलेली मतं – 24 हजार 197

राजकीय कारकीर्द :
1997 व 2002 दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे.
2004, 2009,2014,2019 चार वेळा आमदार;
2014 ते 2019 विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते;
12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 विधानसभा विरोधी पक्ष नेता,
5 डिसेंबर ते नोव्हेंबर 2019 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री; तसेच जानेवारी 2019 सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री;
ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; डिसेंबर 2019 पासून शिवसेनेचे गटनेते;
नोव्हेंबर 2019 पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री.