---Advertisement---
राजकारण जळगाव जिल्हा महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंचे ‘ते’ गाणं होतंय व्हायरल, एकनाथ एकनाथ एक हाक येते…

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । शिवसेनेचे काद्दावर नेते आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचा बोलबाला होत आहे. त्या एकनाथ शिंदेंवर काही वर्षांपूर्वी ‘एकनाथ एकनाथ एक हाक येते’ असं गाणं बनवण्यात आलं आहे. हेच गाणं आज संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ एक मोठा समूह उभा आहे. शिवसेनेचे ३९ आमदार आज एकनाथ शिंदेंसोबत आहेतच परंतु त्या बरोबरच एकनाथ शिंदें सोबत काही खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व स्थानिक नेतृत्व देखील ठामपणे उभ आहे. एकीकडे शिंदे यांचे वर्चस्व वाढत असतांनाच आज एकनाथ शिंदेंवर आधारित ते गाणं आज संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत असून या गाण्याने शिंदेंच्या बंडखोरीला आणखी बळ मिळत आहे.

eknath shinde song jpg webp

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून तब्बल ३९ आमदार फोडले गोहाटी येथे जाऊन बसले आहेत. त्यानंतर गोवा मार्गे महाराष्ट्रात येणार आहेत. एकनाथ शिंदे यांच बंड किती मोठा आहे हे आता नागरिकांना सांगायची गरज नाही. कारण शिवसेनेच्या इतिहासातल हे सगळ्यात मोठ बंड आहे. किंबहुना महाराष्ट्रातल्या इतिहासातही एकही पक्षात झाले नाही इतके आमदार घेऊन कधीही कोणताही नेता गेला नव्हता. यामुळे एकनाथ शिंदे आता काही ठाण्या पुरते किंबहुना महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नसून आता ते देशाचे नेते झाले आहेत. संपूर्ण देशातील हिंदुत्ववादी संघटना, हिंदुत्ववादी विचारसरणी शिंदेकडे एका हिंदुत्ववादी नेता म्हणून बघत आहे. यातच त्यांच्या वर आधारित ते गाणं आता संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत असताना हे गाणं ऐकायला संपूर्ण महाराष्ट्रातली जनता उत्सुक झाली आहे. जास्तीत जास्त प्रमाणावर हे गाणं व्हायरल करत आहे.

---Advertisement---
Eknath Shinde Saheb Gauravgeet | एकनाथ एकनाथ एक हाक येते | Shivsena | Thane

अरे तू हे गाणं ऐकलं का रे ? असा प्रश्न एकमेकांना विचारत आहे. कारण ज्याप्रकारे शिंदे यांचे कर्तृत्व संपूर्ण गाण्यांमध्ये नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहे. त्यांच्या कर्तृत्वा बद्दलचे गुणगान एकूण कोणत्याही मराठी माणसाच्या अंगाला शहारा आल्या शिवाय राहणार नाही. इतकं उत्कृष्ट गाण बनवण्यात आल आहे.लाईट अँड शेड ने हा व्हिडियो पब्लिश केला आहे. या गाण्याला आता पर्यंत ३३ हजार मिळाले आहेत. एकनाथ शिंदे यांच गौरव गीत म्हटल्या जाणाऱ्या या गाण्यात उद्धव ठाकरे यांच नाव इतक घेण्यात आलेलं नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---