---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

एकनाथ शिंदे सत्ता आणण्यात यशस्वी झाले. मात्र रामराज्य आणू शकले नाहीत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात सत्ता आणण्यात यशस्वी झाले आहेत. मात्र ते अद्याप रामराज्य आणू शकले नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

khadse and shinde jpg webp

दिवाळीच्या दिवशी श्रीरामाने रावणावर विजय मिळवला. ते विजय मिळवून परत आले होते. एकीकडे श्रीरामाने आज विजय संपादन केला होता. दुसरीकडे महाराष्ट्रातही शिंदे यांनी विजय संपादन केला आहे. मात्र श्रीराम यांनी जे रामराज्य आणले होते, ते रामराज आणण्यात शिंदे सरकार कमी पडत आहे. असे यावेळी खडसे म्हणाले.

---Advertisement---

पुढे बोलताना खडसे म्हणाले कि, मागील तीन ते चार महिन्यांपासून भीषण चित्र निर्माण झाले आहे. या चार महिन्यांत शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. सर्वच क्षेत्रात महागाईने उचांक गाठला आहे. सर्वसामान्य माणसाचं जगणं कठीण झालं आहे. शिंदे सरकार आश्वसन देत आहे. मात्र कृतीत काहीही उतर नसल्याचे दिसत आहे

दरवर्षी दिवाळी येते. हा सण आपण उत्साहाने साजरा करतो. मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. महागाईचे चटके जाणवत आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील आहे, अशी खंतही खडसे यांनी बोलून दाखवली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---