⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | महाराष्ट्र | मोठी बातमी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केलं इग्नोर

मोठी बातमी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केलं इग्नोर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । Eknath Shinde Ignored Uddhav Thakre । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या पदावरून खाली खेचत स्वतः मुख्यमंत्री झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या विधानाला थेट इग्नोर केलं. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी शिंदे यांना उद्धव ठाकरेंवर प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नाचे उत्तर न देता भलत्याच प्रश्नाचे उत्तर देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इग्नोर केलं. (Eknath Shinde Ignored Uddhav Thakre)

काल सायंकाळी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने तमाम शिवसैनिकांच्या व महाराष्ट्रातील नागरिकांच्या भुवया उंचावले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात बंड करत एकनाथ शिंदे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ५० आमदार आहेत. यातील ३९ हे शिवसेनेतले बंडखोर आमदार आहेत.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर ट्विटर द्वारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला शुभेच्छा दिल्या. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मात्र ते शिवसेनेचे मुख्यमंत्री नाही असे विधान त्यांनी केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाली की, शिवसेनेला जर अडीच वर्षे मुख्यमंत्री पद द्यायचं होतं तरी अडीच वर्षे आधी केलं असतं. आमच्या पुढे युती तोडण्याचा प्रश्नच आला नसता. मात्र आता भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झाला नसून एकनाथ शिंदे आता भाजपाचेही नाहीत आणि ते आता शिवसेनेचेही नाहीत.

यावर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता, एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले की, मी मुंबईत आलो आहे. तो मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू झाला असून दुर्घटना वाढत आहेत. त्या अनुषंगाने मी मुंबईमध्ये दौरा करत आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाबत प्रश्न विचारला असता त्याबाबत एकनाथ शिंदे काहीही म्हणाले नाहीत. उलट त्यांनी प्रश्नाचे भलतेच उत्तर देऊन उद्धव ठाकरे यांना इग्नोर केले.

ठाकरे शिंदे वाद आता काही पक्षांतर्गत राहिले नसून हा आता संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत धुस्पुस होत होती. म्हणुन त्यांनी पक्ष फोडून पक्षात बंड केले असे म्हटले जात आहे. यातच आता त्यांनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांचा प्रश्न टोलवला यामुळे आता शिंदे ठाकरे वाद टोकाला गेल्याचे दिसत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह