⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

गिरीश फक्त पोरींचे फोन उचलतो, एकनाथ खडसेंची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । माजी मंत्री एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांच्यातील वाद सर्वांनाच माहित आहे. या वादात आता एक नवी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. यात एकनाथ खडसे गिरीश महाजन यांच्याविषयी तो फक्त पोरींचाच फोन उचलतो असं म्हणत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, वडगाव बुद्रुक गावात प्रचंड पाणी टंचाई आहे. हे गाव गिरीश महाजन यांच्या मतदार संघात येते. गावात पाणी नसल्याने गावातील एक तरुण थेट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेना फोन करून तक्रार करतांनाचा संवाद व्हायरल झाला आहे. या संवादात जामनेर तालुक्यातील वडगाव बुद्रुकला पाणी नाही अशी तक्रार युवक करत असतांना खडसे यावर बोलतात कि…

(व्हायरल व्हिडीओ बातमीच्या शेवटी आहे.)

कसं काय पाणी नाही तुझा आमदार कुठं मेला…
का…?
आमदार काय करतोय गिरीश… इकडे तिकडे बायकांमागे फिरतोय निस्ता …
आमदार फोन उचलत नाही असं समोरील मुलगा सांगतांना खडसे पुढे म्हणतात… की पोरींचाच फोन उचलतो.
अशाप्रकारचा सवांद त्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये आहे.

दरम्यान, सोशल मीडियात व्हायरल होत असलेली ही ऑडिओ क्लीप कितपत खरी आहे याला अद्याप कुणाकडूनही दुजोरा मिळालेला नाही.