सोमवार, डिसेंबर 11, 2023

.. ही त्यांची जुनीच सवय ; मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून एकनाथ खडसेंची फडणवीसांवर टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२३ । मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खोट्या आश्वासनातून आंदोलने दाबण्याची ही फडणवीस यांची जुनीच सवय म्हणत आगामी निवडणुकीत सरकारची फार मोठी अडचण होईल, असा दावा त्यांनी यावेळी केला.

मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी आमचे संकट मोचक (गिरीश महाजन) व एकनाथ शिंदे त्यांना भेटण्यासाठी गेले व त्यांनी जरांगे व त्यांच्या सहकार्‍यांना 40 दिवसांत आरक्षण देण्याचा शब्द दिला मात्र आता तसे काहीच होत नाही. यांनीच त्यांना आरक्षण मिळेल म्हणून उचकावले होते. जरांगे पाटील यांचे उपोषण व मराठा आरक्षणाचा आगामी लोकसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होईल, असे दावा खडसे यांनी यावेळी केला.

पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना आलेल्या 137 कोटींच्या नोटीशीवर भाष्य करताना दाल में कुछ काला, असे म्हटल्यानंतर खडसे यांनी या वाक्याचा समाचार घेत ‘वो काले लोग है, उन्हे सब कालाही दिखेगा’, असा टोला लगावला.