जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२४ । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जळगाव दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत ‘लखपती दीदीं’चा मेळावा होणार आहे. या मेळाव्याची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला तुम्ही जाणार का? असा सवाल माध्यमांनी एकनाथ खडसे यांना विचारला. त्यावर खडसेंनी उत्तर दिल.
काय म्हणाले खडसे?
एकनाथ खडसे म्हणाले, शासकीय कार्यक्रम असूनही मला आमदार म्हणून कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नाही. त्यामुळे मी या कार्यक्रमाला जाणार नाही, असं खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. जिल्ह्यात नरेंद्र मोदी यांचा लखपती दीदी हा शासकीय कार्यक्रम असताना सुद्धा आतापर्यंत त्याचं शासकीय निमंत्रण मिळालं नसल्याचं एकनाथ खडसे यांनी माध्यामांसमोर थेट बोलून दाखवले.
पुढे खडसे म्हणाले, सर्व आमदारांना शासकीय कार्यक्रम असल्यामुळे निमंत्रण देणं नियमानुसार बंधनकारक असते असे असताना सुद्धा निमंत्रण देण्यात आले नाही. तसेच जर वेळेत निमंत्रण मिळाला असतं तर कार्यक्रमाला जाणार होतो मात्र आता आहे त्यावेळी जर निमंत्रण मिळालं तर जाणार नसल्याची एकनाथ खडसे यांनी जाहीर केले.