---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

..म्हणून मी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटलो; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर एकनाथ खडसे काय म्हणाले?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२५ । माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या भेटीने जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या चर्चा पुन्हा जोरात सुरू झाल्या आहेत, परंतु खडसे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

MAL khadse jpg webp

एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले की ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात भेटले होते. “मी मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. भाजपमध्ये जाणं किंवा भाजपमध्ये प्रवेश करणे किंवा कुठलीही राजकीय चर्चा फडणवीस यांच्यासोबत झालेली नाही,” असं त्यांनी सांगितले. खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि त्यांच्या मतदारसंघात सहकारी तत्वावर सूत गिरणी, मंदिर, इंजिनिअरींग कॉलेज यासारख्या विषयांवर चर्चा केली.

---Advertisement---

गिरीश महाजन यांच्यासोबत ते होते का असा प्रश्न विचारल्यानंतर, खडसे यांनी स्पष्ट केले की “माझ्यासोबत कोणीही नव्हतं, मी एकटा होतो.” ही भेट ही केवळ विकास कामांसंदर्भातच होती, असं ते म्हणाले.

एकनाथ खडसे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी खासदार आणि केंद्रात मंत्री असलेल्या सून रक्षा खडसे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, तेव्हा सुद्धा त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. राज्यात, विशेषतः खानदेशात, भाजपची पाळंमुळं घट्ट करण्यात नाथाभाऊंचा मोठा वाटा आहे. ४० वर्षात त्यांनी विविध पदांवर भाजपचे नेतृत्व केले आणि पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. परंतु पक्षातील अंतर्गत कुरबुरु वाढल्यामुळे व्यथित होऊन नाथाभाऊंनी पक्ष सोडला आणि शरद पवार यांच्यासोबत गेले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---