एकनाथ खडसेंच्या रखडलेल्या भाजप प्रवेशावर गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; अनेकांच्या भुवया उंचावल्या

सप्टेंबर 15, 2024 3:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२४ । लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थित भाजप प्रवेश केल्याचे फोटोही समोर आले होते. मात्र त्यांचा अद्याप अधिकृत भाजप प्रवेश झाला नाहीय. यातच एकनाथ खडसे यांनी माझा कट्ट्यावर गौप्यस्फोट करत रखडलेल्या भाजप प्रवेशावरून देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले. या दोघां नेत्यांमध्ये माझा भाजप प्रवेश रखडलेला असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले होते. आता त्यांच्या या विधानावर गिरीश महाजनांनी मोठं वक्तव्य केलं असून त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

khadse mahajan

गिरीश महाजन म्हटले की, एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस काय बोलले हे मला माहित नाही. ते आमचे वरिष्ठ नेते आहेत. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. एकनाथ खडसे जर भाजपमध्ये येत असतील तर आम्ही फटाके फोडून त्यांचं स्वागत करणार असल्याचे त्यांनी म्हटले. तर, एकनाथ खडसे यांनी माझ्याबाबत ‘एबीपी’च्या माझा कट्ट्यावर जे काही बोलले आहेत. त्याला आपणही माझा कट्ट्यावर जाऊन उत्तर देणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
तर, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ खडसे काय म्हणाले, ते मी ऐकलं नाही. त्यांच्यासंदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्त्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला मान्यच आहे. त्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करुन एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे म्हणत त्यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत महत्त्वाचे संकेत दिले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now