---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या महाराष्ट्र राजकारण

एकनाथ खडसे सत्तापिपासून, ते केवळ.. ; खडसेंच्या भाजप प्रवेशावर आ.चंद्रकांत पाटीलांची खोचक टीका

ck
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२५ । शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची सागर बंगल्यावर भेट घेतल्यामुळे खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. याच दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी खडसेंवर जोरदार टीका केलीय. एकनाथ खडसे हे सत्ता पिपासू असून जिकडे सत्ता तिकडे ते जाण्याचा प्रयत्न करत असतात अशी टीका आमदार पाटीलांनी केली आहे.

ck

एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेतल्याचे समोर आल्यानंतर, त्यांनी या भेटीचे स्पष्टीकरण देत भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. “मी माझ्या मतदारसंघातील विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलो होतो असं खडसे म्हणाले.

---Advertisement---

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
मात्र एकनाथ खडसेंनी फडणवीसांची भेट घेतल्यावरून आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत खडसेंवर जोरदार टीका केली. एकनाथ खडसे हे सत्ता पिपासू आहे. जिकडे सत्ता तिकडे ते जाण्याचा प्रयत्न करतात. मागील काळात महाविकास आघाडी सरकार आले लेगच ते तिकडे गेले. नंतर भाजपचे सरकार आले तर ते भाजपामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत,. सत्तेतून मालमत्ता मिळवत आपले दुकान चालू ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. खडसे केवळ सत्तेसाठी नाही तर त्यांच्या मागील ईडी सारख्या कारवाई कशा थांबतील? यासाठी त्यांनी भेट घेतली असावी, अस शिंदे गटाचे आ. चंद्रकांत पाटील यांनी म्हटल आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---