⁠ 
शनिवार, सप्टेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | नाथाभाऊंनी गमावला नेपाळ बस अपघातात बालपणीचा मित्र ; मृतांचा आकडा वाढला

नाथाभाऊंनी गमावला नेपाळ बस अपघातात बालपणीचा मित्र ; मृतांचा आकडा वाढला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२४ । देवदर्शनासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह विशेष विमानाने शनिवारी रात्री जळगाव येथे आणण्यात आले. दरम्यान, या अपघातातील गंभीर जखमी असलेल्या आणखी तिघांचा मृत्यू झाला. यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या बालपणीच्या मित्राचा देखील निधन झालं आहे.

यासंदर्भातील माहिती खडसे यांनी माध्यमांना दिली. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो असं म्हणत खडसे भावूक झाले. बालपणीचा मित्र गमावल्याने त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.नेपाळ बस दुर्घटनेतील आता मृताचा आकडा ३० वर पोहचला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यात ३० जणांपैकी बस चालक आणि किन्नर असे दोन जण सोडून २८ जण हे आपल्या परिसरातील होते असेही ते म्हणाले

नेपाळमधील बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २७ जणांचे मृतदेह विशेष विमानाने शनिवारी रात्री जळगाव येथे आणण्यात आले. विमानतळावरून मृतदेहांसाठी २७ स्वतंत्र अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती.

जळगाव विमानतळावर मृतदेह आणल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. दरम्यान, विमानतळावरून रुग्णवाहिकेतून मृतदेह वरणगाव येथे नेण्यात आले. आमदार एकनाथ खडसे यांनी मयत कुटुंबियांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.या सर्व मयत व्यक्तींवर शनिवारी रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुर्दैवी बाब म्हणजे अपघातातील गंभीर जखमी असलेल्या आणखी तिघांचा मृत्यू झाला. यात एकनाथ खडसे यांच्या बालपणीच्या मित्राचा देखील समावेश होता. मित्राचे निधन झाल्याचे कळताच एकनाथ खडसे भावूक झाले होते. त्यांनी माध्यमांसमोर अश्रूंना वाट मोकळी करून दिली.सुधाकर जावळे हा माझा कार्यकर्ता नव्हता तो माझा सवंगडी होता असं म्हणत एकनाथ खडसे भावुक झाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.