⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | सरड्यासारखे रंग तू बदलतो का मी? एकनाथ खडसेंची आमदार चंद्रकांत पाटीलांवर खोचक टीका

सरड्यासारखे रंग तू बदलतो का मी? एकनाथ खडसेंची आमदार चंद्रकांत पाटीलांवर खोचक टीका

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ सप्टेंबर २०२४ । एकनाथ खडसे यांनी भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याने मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली. एकनाथ खडसे “हे सरपटणारे, रंग बदलणारे प्राणी”, अशी टीका आमदार चंद्रकांत पाटीलांनी केली. आता त्यांच्या या टीकेला एकनाथ खडसे यांनी एकेरी भाषेचा उल्लेख करत सडेतोड प्रत्युत्तर दिलं. सरड्यासारखे रंग तू बदलतो का मी बदलतो?”, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला.

काय म्हणाले नेमकं एकनाथ खडसे?
“आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे नीतीमत्ता तरी आहे का? चंद्रकांत पाटील हा शिवसेनेचा अध्यक्ष होता. निवडणुकीमध्ये तो अपक्ष उभा राहिला. त्यानंतर शरद पवार यांच्या मदतीने निवडून आला. त्यानंतरच्या कालखंडामध्ये तो उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला. कालांतराने पुन्हा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. किती वेळा नवरे बदलले तू आणि कुणाला बोलतो?”, अशी खोचक टीका एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

“राष्ट्रवादीच्या जीवावर आमदार झाला. त्यानंतर उद्धव ठाकरेंकडे गेला. आता म्हणतो मी शिंदेंचा आहे. त्यामुळे सरड्यासारखे रंग तू बदलतो का मी बदलतो?”, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला. एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वाद हा सर्वश्रूत आहे. त्यांच्यात सातत्याने वाद होत असतात. चंद्रकांत पाटील हे एकनाथ खडसे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, अशी राजकीय वर्तुळात नेहमी चर्चा असते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.