एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर अत्यंत धक्कादायक आरोप, म्हणाले..

जुलै 2, 2023 11:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर अत्यंत धक्कादायक आरोप केला असून यामुळे जिल्ह्यासह राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. गिरीश महाजन यांनी अनेक ठिकाणी तोंड काळं केलं असं खडसे म्हणाले आहे.

girish mahajan and eknath khadse jpg webp

गिरीश महाजन यांच्या आजूबाजूला गुंड प्रवृत्तीची लोक आहेत. स्वत: महाजनांवर मोक्का लागलेला आहे. ते जामिनावर सुटलेले आहेत. महाजन यांनी अनेक ठिकाणी तोंड काळं केलेलं आहे. फक्त ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

पुण्यात गुटखा किंगवर कारवाई करण्यात आली. तो गिरीश महाजनांच्या अत्यंत जवळचा आहे. महाजनांच्या आशीर्वादानेच तो गुटखा विकायचा का? मागच्या कालखंडात नाशिकमध्ये एकावर मोक्का लावण्यात आला होता. तोही महाजन यांच्या अत्यंत जवळचा होता. तो महाजन यांच्या गाडीमध्ये जवळ जाऊन बसायचा. त्यामुळे गिरीश महाजनांच्या आजूबाजूला गुंड प्रवृत्तीचे अनेक लोक आहेत हे दिसून येतं, असं खडसे म्हणाले

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now