ओएचई वायर तुटल्याने तीन गाड्यांचे मार्ग बदलले ; आठ गाड्या विलंबाने
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१ । अस्वली-लहाव्हीट दरम्याल ओएचई वायर तुटल्याने आठ गाड्या सुमारे सहा तासे विलंबाने धावत असून तीन गाड्यांचा मार्ग (रूट) बदलण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. सोमवार, 25 रोजी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास ओव्हर हेड वायर अस्वली-लहाव्हीट दरम्यान अचानक तुटल्यानंतर रेल्वेची वाहतूक विस्कळीत होवून रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली.
मनमाड तसेच नाशिक येथील स्टाफला पाचारण करण्यात आल्यानंतर पहाटेपर्यंत ओएचईचे काम पूर्ववत करण्यात आल्यानंतर 02167 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंडूवाडी एक्स्प्रेस ही सकाळी 8.10 वाजेच्या सुमारास रवाना झाली. या प्रकारामुळे प्रवाशांचा चांगलाच मनस्ताप सोसावा लागला.
सहा तास विलंबाने धावताय गाड्या
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार ओएचई तुटल्याच्या प्रकारामुळे सुमारे सहा तास विलंबाने गाड्या धावत असल्याने प्रवाशांनादेखील चांगलाच मनस्ताप सोसावा लागला आहे. गाडी क्रमांक 02811 लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटीया, 02167 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंडूवाडी एक्स्प्रेस, 02103 लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर एक्स्प्रेस, 02193 मुंबई ते वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, 02322 मुंबई ते हावडा एक्सप्रेस, 02141 लोकमान्य टिळक टर्मिनस ते पाटलीपुत्र एक्स्प्रेस, 01057 मुंबई ते अमृतसर एक्स्प्रेस, 02538 लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस विलंबाने धावत आहे. शिवाय 02171 लोकमान्य टिळक टर्मिनस ते हरीद्वार एक्स्प्रेस, 05017 लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर काशी एक्स्प्रेस, 04313 लोकमान्य टिळक टर्मिनस ते बरेली एक्स्प्रेस या गाड्या वसई, नदुंरबार, जळगावमार्गे वळण्यात आल्या आहेत.