जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । भरधाव ट्रक व बसचा समोरा-समोर धडकून झालेल्या अपघात आठ प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवार, २७ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील भोरटेकजवळ घडला. अपघातातील जखमींवर गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील भोरटेकजवळ बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास रावेर आगाराची बस (क्रमांक एम.एच. 40 एन.9063) ही प्रवासी घेऊन जळगावकडून रावेरला जात असताना फैजपूरकडून भुसावळकडे ट्रक (क्रमांक यु.पी.80 सी.टी.7536) हा जात असताना या दोघांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बसमधील आठ प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने घटनास्थळावरून गोदावरी हॉस्पिटलला उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. अपघातात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारपर्यंत सुरू होते