⁠ 

अंडे का फंडा.. जाणून घ्या अंडीबद्दलचे रोचक तथ्य!

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । अंडे का फंडा…. हे आपण नेहमी ऐकत असतो. तर अंड्याचा नेमका काय फंडा असेल हा प्रश्न देखील मनात येतो ना? तर अंडे का फंडा… या फंड्याबद्दल आज आपण विशेष माहिती जाणून घेणार असून त्यामागे आज एक महत्वाच कारण आहे. आज आहे जागतिक अंडी दिवस..  दररोज अंडी खाणं किती फायदेशीर आहे आणि अंडीमध्ये काय काय जीवनसत्व असतात हे आपण जाणून घेऊ..!

रोजच्या आहारात भरपूर पोषकतत्त्वं असणारा नैसर्गिक अन्नपदार्थ म्हणजे कोंबडीचं अंडं. सर्वाधिक प्रोटीन मिळणार एकमात्र खाद्य म्हणजे अंडी. मेंदूचं क्रियान्वयन सुधारण्यापासून ते शारीरिक तंदुरुस्ती आणि लहान मुलांची वाढ नीट करण्यापर्यंतचा फायदा अंडी खाल्ल्याने होतो.

आहारात का असावा अंडीचा समावेश?
अंडं हे महत्त्वाचं स्टेपल फूड आहे. एका मोठ्या उकडलेल्या अंड्यात ७७ कॅलरी आणि फोलेट, फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम, झिंक अशी खनिजं असतात. या अंड्यात A, B5, B12, B6, D, E, K ही व्हिटॅमिन्स आणि ६ ग्रॅम प्रोटिन ५ ग्रॅम हृदयासाठी पोषक फॅट्सपण असतात, अंड्यात प्रचंड प्रमाणात पोषक तत्त्वं असल्याने माणसाच्या नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीला बळकट करण्यासोबतच शारीरिक विकासातही अंडी महत्त्वाची भूमिका बजावतात म्हणून रोज एक उकळलेलं अंडं आहारात घेतलं कि शरीराला पौष्टिकता मिळते.

एक उकळलेलं अंड तुम्हाला काय देऊ शकत?
एका उकडलेल्या अंड्यात ४१७mg चोलाईन उपलब्ध असतं. चोलाईन आपल्या शरीरात काय कार्य बजावत असते? तर ‘मानवी मेंदूतील पेशींची मेमरेन तयार करण्यासाठी आणि सिग्नलिंग मॉलेक्युल तयार करण्यासाठी पाण्यात विरघळणारं चोलाईन हे व्हिटॅमिन शरीराला मिळणं गरजेचं असतं. तसंच अंड्यात असलेलं ल्युटिन, झिअक्सनथिन, अंड्याचं बलक यात असलेल्या अँटिऑक्सिडंटमुळे डोळ्यांत मोतीबिंदू होण्याची तसंच पेशी कमकुवत होण्याचा धोका कमी होते. अंड्यात व्हिटॅमिन A असतं त्यामुळे त्याच्या सेवनामुळे स्पष्ट दिसण्यासाठी मदत होत असते. अंड्यात असलेल्या ओमेगा-3 फॅटी असिडमुळे हृदय, मेंदू आणि डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखायला मदत होते. अंड्यांमध्ये जास्त प्रोटिन आणि कमी कॅलरी असतात त्यामुळे अंडी खाल्ल्यावर भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अंडी खाण्याचा फायदा होतो. अंड्यामध्ये 6 ग्रॅम दर्जेदार प्रोटिन असतं ज्याचा उपयोग वजनाचं नियंत्रण, स्नायूंचं वजन वाढवणं, रक्तदाब कमी करणं आणि हाडं मजबूत करण्यासाठी होतो.

अंडयांचे किती प्रकार आहेत हे तुम्हाला माहित आहे का?

सर्व पक्षी, काही उभयचर प्राणी, काही सरपटणारे प्राणी आणि मासे यांच्या माद्या अंडी घालतात. अंडी घालणार्‍या प्राण्यांना ‘अंडज’ म्हणतात. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या अंड्यांत विविधता आढळत असते. शहामृगाचे अंडे सुमारे १.५ किलोग्रॅम वजनाचे असते, तर कोंबडीचे अंडे ५५-६० ग्रॅम  वजनाचे असते. अंड्याचे कवच कॅल्शियम कार्बोनेटाचे असून रंगाने पांढरे असते. कवचातील झिंकच्या संयुगामुळे त्यावर निळे हिरवे, तर प्रोटोप्रोफायरिनामुळे लाल तपकिरी रंगाचे ठिपके आढळतात. बहुतांशी अंडी गुळगुळीत असतात. काही बदकांची अंडी बाहेरून तेलकट असतात. कवचावर मोठ्या प्रमाणात आढळणारी सूक्ष्म छिद्रे अंड्यातील जीवाच्या श्वासोच्छ्वासासाठी उपयोगी असतात.

कोंबडीचे अंडे फायदेशीर

अंडे फलित किंवा अफलित अंडे उबविण्याच्या प्रक्रियेत अंड्यातील भ्रूणाला संरक्षण मिळून त्याचे पोषण होते.भ्रूणाची पूर्ण वाढ झाली की अंड्याचे कवच फोडून पिलू बाहेर येते. पक्ष्यांच्या अंड्यांचा वापर अन्न म्हणून केला जातो. अंडे हे अत्यंत पौष्टिक असल्याने मानवी आहारात त्याचा उपयोग वर्षानुवर्षे होत आहे. प्रामुख्याने कोंबडी, बदक, हंस, शहामृग इ. पक्ष्यांच्या अंड्यांचा वापर खाण्यासाठी केला जात असला, तरी त्यात सर्वाधिक वापर पाळीव कोंबड्यांच्या अंड्यांचा होतो. अंडी दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी शीतगृहाचा वापर केला जातो.

अंड्यांचे तीन भागात वर्गीकरण

अंड्याचे कवच, पांढरा बलक आणि पिवळा बलक असे तीन प्रमुख भाग असतात. अंड्याच्या एकूण वजनापैकी १० टक्के वजन कवचाचे, ५८ टक्के वजन पांढर्‍या बलकाचे, ३२ टक्के वजन पिवळ्या बलकाचे असते. पांढर्‍या बलकात पाणी ८७ टक्के व प्रथिने १३ टक्के तर पिवळ्या बलकात पाणी, मेद व प्रथिने असतात. प्रथिनांमध्ये माणसाच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व अ‍ॅमिनो आम्ले असतात. पिवळ्या बलकातील मेदांमध्ये असंतृप्त मेदाम्ले व कोलेस्टेरॉल ३०० मिग्रॅ. असते.