⁠ 
बुधवार, मे 8, 2024

म्युझिक थेरपीचा वापर परिणामकारक : डॉ. सुजाता सिंधी

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२। रुग्णांवर गोळ्या, औषधींद्वारे उपचार करण्यात येतात, त्यासोबत जर म्युझिक थेरपीचा वापर केला तर रुग्णाची प्रकृती स्थिर होण्यावर सकारात्मक परिणाम होत असतात असे प्रतिपादन स्पीरिच्युअल स्पीकर डॉ. सुजाता सिंधी यांनी केले.

येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालय आणि डॉ. उल्हास पाटील फिजीओथरेपी महाविद्यालयातर्फे साऊंड, म्यूझिक व मेडिसीनवर कार्यक्रम पार पडला. डॉ. सुजाता सिंधी यांनी म्युझिक थेरपी कशी उपयुक्त ठरते याचे स्पष्टीकरण दिले. त्यांना म्युझिक कंपोझर जैनाम सिंधी यांची साथ लाभली. प्रमुख म्हणून डॉ. हर्षायता नाहाटा, फिजीयोथेरपीस्ट डॉ.मनी मुथा यांची उपस्थिती होती. याप्रसंगी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मौसमी लेंढे, डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपीचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, प्रशासकीय अधिकारी राहूल गिरी उपस्थित होते.