तांदलवाडीला आयोजित ‘बाल प्रशिक्षण’ शिबिरास खा. रक्षा खडसेंची भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील श्री दत्त मंदिर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातर्फे “बाल प्रशिक्षण वर्गाचे” आयोजन करण्यात आले होते. यास खा. रक्षा खडसे यांनी भेट दिली व समारोप कार्यक्रमास उपस्थित राहल्या. यावेळी त्यांनी स्वंयसेवक व बाल स्वंयसेवक यांच्यासोबत संवाद साधला व प्रशिक्षण वर्गाची माहिती घेतली.

खा. रक्षा खडसे यांच्यासह विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा तालुका सरचिटणीस महेश चौधरी, हरलाल कोळी, भाजयुमो तालुका सरचिटणीस शुभम पाटील, सिंगत सरपंच प्रमोद, ग्रा.प.सदस्य अरुण पाटील, उपसरपंच प्रमोद उन्हाळे, गोकुळ सेंदाने, उदयभान कोळी, सुमित पाटील, राहुल पाटील, रतन कोळी, संजय महाजन, गौरव महाजन, दुर्गेश पाटील, संघ शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.