वाघोदा ग्रामपंचायतला खा. रक्षा खडसेंची भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक श्रावगे । रावेर तालुक्यातील विकसनशील ग्रामपंचायत असलेल्या वाघोदा बु येथील ग्रामपंचायतला खा. रक्षा खडसे यांनी सदिच्छा भेट दिली व गावातील विकासकामांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, गावाच्या विकासासाठी आपण सदैव हाक द्या मी मदतीसाठी तयार असल्याचे देखील सांगितले.


तसेच त्यांनी ग्रामस्थ तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यां सोबत देखील संवाद साधला व ग्रामस्थांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी खा. रक्षा खडसे यांच्यासह भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा तालुका सरचिटणीस महेश चौधरी, हरलाल कोळी, भाजयुमो तालुका सरचिटणीस शुभम पाटील, संजय माळी, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल गोपाळ महाजन, राहुल काशिनाथ पाटील, संजय काशिनाथ माळी, गुरुदत्त नीलकंठ पाटील, हर्शल दिलीप पाटील, लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी, प्रवीण त्र्यंबक पाटील, रविंद्र कडू पाटील, गोकुळ रामदास महाजन, बाळू काकडे, विशाल पाटील, दुर्गेश पाटील, रमाकांत महाजन, सरपंच मुबारक अलीखा तडवी यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.